महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यासमोर भारनियमनाचे संकट.. कोयनेतून होणारी वीजनिर्मिती बंद - electricity-production

कोयना धरणात केवळ १० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वीज निर्मिती ठप्प करण्याचे आदेश जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहेत. पाणीसाठी कमी झाल्याने काही भागात पाणीटंचाई भासणार असल्याचे निदर्शनास येताच तिसऱ्या टप्प्यातील वीजनिर्मिती कमी दाबाने सुरू आहे.

कोयनेतून होणारी वीजनिर्मिती ठप्प

By

Published : May 31, 2019, 8:05 PM IST

सातारा - कोयना धरणात केवळ १० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वीज निर्मिती ठप्प करण्याचे आदेश जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी दिले आहेत. पाणीसाठी कमी झाल्याने वीजनिर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

धरणातील पाणीसाठी कमी झाल्याने काही भागात पाणीटंचाई भासणार असल्याचे निदर्शनास येताच तिसऱ्या टप्प्यातील वीजनिर्मिती कमी दाबाने सुरू आहे. मात्र, त्यातून १२० मेगावॅट इतकी अत्यल्प वीजनिर्मिती होणार आहे. एकूण 1 हजार 956 क्षमता असलेल्या या प्रकल्पातील वीजनिर्मिती एवढ्या मोठ्या प्रमाणात बंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आगामी काळात राज्याला अघोषित भारनियमनास सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने वीजनिर्मिती पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारेंनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता वैशाली नारकर यांनी दिली. पुढील आदेश प्राप्त झाल्यावर वीजनिर्मिती चालू करावी, असे पत्र महानिर्मिती कंपनीला दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

याबाबत कोयना विद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता मोरे म्हणाले, की पश्चिमेकडील १९६० मेगावॅट वीजनिर्मिती पैकी १८२० वीजनिर्मिती बंद केली आहे. जलविद्युत प्रकल्पाचे ६०० मेगावॅट क्षमतेचे एक व दोन टप्पे २४ तास चालवले जाणार आहेत. त्यातून ४० मेगावॅट आणि ३२० मेगावॅट क्षमतेचा टप्पा क्रमांक ३ मधून ८० मेगावॅट अशी १२० मेगावॅट वीजनिर्मिती दररोज ५ तास करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details