कराड (सातारा) -कराड तालुक्यातील 14 आणि पाटण तालुक्यातील 4 अशा एकूण 18 रुग्णांना कृष्णा हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 162 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कृष्णा हॉस्पिटलमधून 18 जणांना डिस्चार्ज; कराड, पाटणमधील रुग्ण झाले कोरोनामुक्त - 18 जण झाले कोरोनामुक्त
कराड तालुक्यातील 14 आणि पाटण तालुक्यातील 4 असे एकूण 18 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यांना कृष्णा हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या कडकडात डिस्चार्ज देण्यात आला.
कराड तालुक्यातील शेणोली स्टेशन येथील 7, म्हासोली येथील 3, वानरवाडी येथील 3, साकुर्डी 1 आणि पाटण तालुक्यातील करपेवाडी, ताम्हिणे, सदुर्पेवाडी, गलमेवाडी येथील प्रत्येकी 1, असे एकूण 18 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमधून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.
तहसीलदार अमरदीप वाकडे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता देशमुख, यासह रुग्णालयातील सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनामुक्त रुग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.