कराड (सातारा)- कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कराडमध्ये प्रशासनाने संयुक्त कारवाई करत आठ दुकानांना 3 हजार रूपये दंड ठोठावून सात दिवस दुकाने सील केली. नगरपालिका, पोलीस आणि महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.
कराडमधील आठ दुकाने सात दिवसांसाठी सील; चंदूकाका सराफ दुकानावरही कारवाई
विना मास्क फिरणाऱ्या वाहन चालकांनवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे कराडच्या बाजारपेठेत चांगलीच खळबळ उडाली आहे.
विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
चंदुकाका सराफ, लक्ष्मी विष्णू क्लॉथ सेंटर, एम. आर. ओसवाल, फ्रेंन्डशिप कलेक्शन, वाडीलाल अॅन्ड सन्स, बॉम्बे रेस्टॉरंट, सागर फास्टफूड पावभाजी सेंटर, रूपसंघवी, या दुकांनांवर द दुकाने सात दिवस सील केली आहेत. पोलीस कर्मचार्यांसह नगरपालिका आणि महसूल विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली. तसेच विना मास्क फिरणाऱ्या वाहन चालकांनवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे कराडच्या बाजारपेठेत चांगलीच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-३० वर्षांपासून 'ती' राहतेय पोलीस ठाण्यात