सातारा -श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त अप्पासाहेब देशमुख ( Appasaheb Deshmukh ) यांना ईडीने ( ED ) शुक्रवारी (१७ जून) अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दि. २४ जूनपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीच्या या कारवाईने सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
माण-खटाव तालुक्यात खळबळ -मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने मायणी येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष महादेव देशमुख यांना अटक केली होती. त्यानंतर आता ईडीने अप्पासाहेब देशमुख यांना अटक केली आहे. दोन सख्ख्या भावांवर झालेल्या ईडी कारवाईमुळे माण-खटाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.