सातारा -जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात रविवारी 2.9 रिश्टर स्केल भूकंपाचा सौम्य स्वरुपाचा धक्का बसला. रात्री साडेनऊ वाजेदरम्यान हा धक्का बसला. या धक्क्यामुळे कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याची माहिती धरण व्यवस्थापन सुत्रांनी दिली.
साताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के; 2.9 रिश्टर स्केल तीव्रता
या आधीही 5 जुलैला कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. रात्री या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 16.8 किलोमीटर अंतरावर होता.
कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के
या आधीही 5 जुलैला कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. रात्री या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 16.8 किलोमीटर अंतरावर होता. तर भूकंपाची खोली 8 किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यात जावळे गावाच्या पश्चिमेला 4 कि. मी. अंतरावर होती, अशी माहिती कोयना सिंचन विभागाने दिली.
Last Updated : Jul 20, 2020, 9:34 AM IST