कराड (सातारा) - जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात शनिवारी मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टरस्केल वरती २.६ इतक्या तीव्रतेची नोंद झाली आहे. याबरोबरच धरण परिसरातील चिपळूण, कोयनानगर, पाटण, कराडसह वारणा खोऱ्यातही या भूकंपाचे हादरे जाणवले. भूकंपामुळे कोणत्याही ठिकाणी जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. कोयना धरण व्यवस्थापनाकडून याबाबतची माहिती देण्यात आली.
कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का - कोयना धरण परिसरात भूकंप
शनिवारी मध्यरात्री १ च्या सुमारास कोयना धरणासह कराड, पाटण आणि चिपळूण परिसर भूकंपाने हादरला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून ११ कि. मी. अंतरावर वारणा खोऱ्यातील चांदोली गावाच्या पश्चिमेला जमिनीत ४ किमी खोल होता, अशीही माहिती कोयना धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.

यापूर्वीही कोयना धरण परिसरात वारंवार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्रीच्या भूकंपानंतर काही नागरिक गाढ झोपेत होते. मात्र, ज्यावेळी भूकंपानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.