सातारा-माहेरहून लग्नात राहिलेले अर्धा तोळे सोने आणि ३ लाख रुपये घेवून ये. मोबाईलचे दुकान टाकायचे आहे. असे म्हणून सासरच्याकडून मानसिक व आर्थिक छळ होवू लागल्याने विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना साताऱ्यातील माण तालुक्यात घडली आहे.
माहेरहून दागिने आणि पैसे आणण्यासाठी होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या - aasma mulani
लग्नात राहिलेले अर्धा तोळे सोने आणि मोबाईलचे दुकान टाकण्यासाठी ३ लाख रुपयांच्या मागणीसाठी होणारा जाच सहन न झाल्याने भालवडी येथील विवाहितेेने आत्महत्या केली.
आसमा अस्लम मुलाणी (वय २३) रा.भालवडी असे या विवाहितेचे नाव आहे. लग्नात राहिलेले अर्धा तोळे सोने व नवऱ्याला मोबाईलचे दुकान टाकण्यासाठी तीन लाख रुपये माहेरहून घेऊन येण्यासाठी तिचा सतत छळ होत होता. याला कंटाळून तिने गुरुवारी पहाटे आपल्या राहत्या घरात भालवडी ता. माण येथे गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती म्हसवड पोलिसांनी दिली आहे.
विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी नवरा असलम जाफर मुलाणी, सासरा जाफर दादाभाई मुलाणी, सासू अफसाना जाफर मुलाणी, दुसरी सासू अमजद जाफर मुलाणी यांच्या विरोधात सूरज शिकंदर शेख रा. लवंग ता. माळशिरस यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे अधिक तपास करत आहेत.