सातारा - जावली तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्धी पावलेले करहर येथील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आज सकाळपासूनच आषाढी एकादशीनिमित्त भक्तांनी आणि राजकीय नेत्यांनी मोठी गर्दी केली होती. ज्या भक्तांना पंढरीची वारी करता येत नाही, असे भक्त करहर येथे येवून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात. गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा यावर्षीही अबाधित आहे.
सातारा जिल्ह्यातील प्रतिपंढरपूर करहर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी - karhar
जिल्ह्यातील ज्या भक्तांना पंढरीची वारी करता येत नाही, असे भक्त जावली तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून प्रसिद्धी पावलेल्या करहर येथे येवून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतात.
जिल्ह्यातील हजारो विठ्ठल भक्त आषाढी एकादशी दिवशी करहर येथे हजेरी लावून विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतात. आज कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार शशिकांत शिंदे, सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे आणि तेजस शिंदे यांनी देखील करहर येथे उपस्थिती लावून विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. यावेळी बळीराजा आणि कामगारांना सुगीचे दिवस येऊ देत, असे साकडे विठुरायाला घालण्यात आले. दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त करहर येथे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भर पावसातही विठ्ठल भक्तांनी उभे राहून दर्शन घेतले.