महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sugarcane Burnt In Kolhapur : रात्रीचा दिवस करून वाढवलेल्या ऊसाची डोळ्यासमोर राख;शेतकऱ्यांना अश्रू अनावर - 50 acres of sugarcane was burnt

आगीत सुमारे ५० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातील वळसे येथे समोर आली आहे. (Sugarcane Was Burnt In Kolhapur) वळसे येथील नारगौंडी शिवारातील विहिरीजवळ शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. काही मिनिटांतच या आगीने उग्र रुप धारण केले. दरम्यान, येथील गावातील ३० शेतकऱ्यांच्या ऊसाला फटका बसला आहे. आता जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यातील वळसे येथे ५० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक
सातारा जिल्ह्यातील वळसे येथे ५० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक

By

Published : Mar 21, 2022, 1:23 PM IST

Updated : Mar 21, 2022, 1:30 PM IST

सातारा (वळसे) - येथे शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत सुमारे ५० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. वळसे येथील नारगौंडी शिवारातील विहिरीजवळ शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे. काही मिनिटांतच या आगीने उग्र रुप धारण केले. दरम्यान, येथील गावातील ३० शेतकऱ्यांच्या ऊसाला फटका बसला आहे. (Sugarcane Was Burnt Kolhapur district) आता जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सातारा जिल्ह्यातील वळसे येथे ५० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक

वाऱ्यामुळे तीव्रता वाढली

शेंद्रे (शाहूनगर) येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाला. मात्र, वाऱ्यामुळे आगीची तीव्रता आणखी वाढली. त्यातच अग्निशमन बंबास शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता न मिळाल्यामुळे मदतकार्यात अडथळे आले. त्यामुळे हानी आणखीच वाढत राहिली. या घटनेत सुमारे ८० लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असण्याची शक्यता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांत चिंतेचे वातावरण

गेल्या महिन्यातच भरतगाव (ता. सातारा) येथेही आगीची घटना घडली होती. त्यात सुमारे १५ एकर ऊसाच्या क्षेत्राची हानी झाली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा अशीच घटना घडली. त्यात मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

हेही वाचा -Raju Shetty On FRP : सरकारने एकरकमी FRPची मागणी फेटाळली! राजू शेट्टी आंदोलनाच्या तयारीत

Last Updated : Mar 21, 2022, 1:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details