महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी १ कोटी २९ लाखांचा पुरवणी आराखडा - undefined

टंचाई निवारणासाठी १ कोटी २९ लाखांचा पुरवणी आराखडा प्रशासनाने तयार केला असून, त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे दुष्काळाशी सामना करण्यास काहीशी मदत होणार आहे.

सातारा

By

Published : Mar 3, 2019, 10:10 PM IST

सातारा -जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. दुष्काळी भागात पाण्याची टंचाई भासू लागल्याने टंचाई निवारणासाठी १ कोटी २९ लाखांचा पुरवणी आराखडा प्रशासनाने तयार केला असून, त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे दुष्काळाशी सामना करण्यास काहीशी मदत होणार आहे.

जिल्ह्यात गतवर्षी पाऊस कमी झाल्यामुळे दुष्काळी परिस्तिथी उद्भवली आहे. माण तालुक्यासह खटाव, कोरेगाव, सातारा, खंडाळा, फलटण तालुक्यातील काही मंडलमध्ये शासनाने दुष्काळ जाहिर केला आहे. सध्या जिल्ह्यातील ७९७ गावे ५८२ वाड्या-वस्त्यांवर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या चारा पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे म्हसवडमध्ये खासगी चारा छावणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत १ आक्टोबर ते ३० जून या कालावधीसाठी ८ कोटी २३ लाखांचा संभाव्य पाणी टंचाई आराखडा बनवला होता. यातून कामे करण्यासाठी १६१ प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरीसाठी पाठवले होते. त्यातील त्यांनी ५७ प्रस्ताव मंजूर केले आहेत.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details