सातारा - जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळ असलेल्या माण-खटाव तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. यामुळे या भागातील लोकांसह शेजारील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक लोक गावे सोडून आपल्या जनावरांना घेऊन चारा छावणीत येत आहेत.
माण आणि खटावमधील काही भागात प्रशासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. पण चारा छावण्या अजून चालू केल्या नाहीत. मात्र, म्हसवड येथे माणदेशी फाउंडेशन आणि बजाज फाउंडेशनमार्फत खासगी चारा छावणी चालू करण्यात आली आहे. त्यामुळे बळीराजाला दुष्काळासाठी दोन हात करण्यासाठी थोडी का होईना मदत झाली आहे. या ठिकाणी अनेक शेतकरी आपल्या कुटुंबासह राहण्यासाठी आले आहेत. तसेच या ठिकाणी स्वयंपाक करून आपले संसार येथेच थाटले आहेत.