सातारा-कोल्हापूर, सांगली, सातारा येथे पावसाने धुमाकूळ घातला आहे. मात्र, नॅशनल जिओग्राफीने 'अ सिटी ऑफ टेंपल' अशी उपाधी दिलेल्या 'वाई' शहरातील कृष्णा नदी जेव्हा ओसंडून वाहते, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी सुखावतो. तसेच पर्टकही याठिकाणचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठीगर्दी करतात.
वाई गणपती मंदिराला कृष्णामाईने घातला वेढा, पाहा ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले दृश्य
सातारा, कोल्हापूर, सांगली, येथे पावसाने धुमाकूळ घातला असताना याच पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाई शहराची जननी कृष्णा नदी ओसंडून वाहत आहे. या कृष्णानदीचे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याकरता जगभरातून अनेक मोठे व्हिडिओ ग्राफर्स येथे येत असतात.
या कृष्णा नदीचे सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्याकरता जगभरातून अनेक मोठे व्हिडिओ ग्राफर्स येथे येत असतात. वाई शहरातील ओसंडून वाहणाऱ्या कृष्णामाईचे मुख्य आकर्षण म्हणजे पेशवेकालीन ढोल्या गणपती. पावसाच्या पाण्याने शहराच्या मध्यभागी असलेल्या ढोल्या गणपती मंदिराला घातलेल्या वेढ्याचे दृश्य पाहण्याकरता अनेक पर्यटक गर्दी करत असतात.
मंदिराचे हेच दृश्य जर आकाशातून पाहिले तर कसे दिसेल असा अनेकजण विचार करतात. आकाशातून ड्रोनच्या माध्यमातून टिपलेले हे दृश्य डोळे दिपवून टाकते. सध्या असेच एक दृश्य सोशल मीडियावर खुप व्हायरल झाले आहे. हे दृश्य वाई शहराजवळ असणाऱ्या पाचपुतेवाडी गावातील यश मांढरे यांनी शूट केले आहे.