महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ.रणजीत पाटील कराडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी; सुरज गुरव पुणे 'एसीबी'चे अधीक्षक - dr. ranjeet patil take charge as new DYSP of karad

कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांची पुणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधीक्षकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी डॉ. रणजित पाटील यांनी आपला पदभार स्वीकारला आहे.

डॉ.रणजीत पाटील
डॉ.रणजीत पाटील

By

Published : Oct 11, 2020, 4:39 PM IST

कराड (सातारा)- डॉ. रणजित पाटील यांनी कराड उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. सुरज गुरव यांची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. कराड उपविभागातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यावर आपला अधिक भर राहील, अशी प्रतिक्रिया डॉ. रणजित पाटील यांनी दिली.

सुरज गुरव यांची तडकाफडकी नागपूरला बदली झाल्यानंतर गुरव यांनी बदली विरोधात मॅटमध्ये धाव घेतली होती. पण, दोनच दिवसांत त्यांनी मॅटमधून आपला अर्ज मागे घेतला होता. त्यांच्या जागी डॉ. रणजित पाटील यांची उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती झाली, तर गुरव यांची नागपूर शहराऐवजी पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

गुरव यांनी कराडमधील वर्षभराच्या कार्यकाळात गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यात यश मिळविले. मोक्का, स्थानबध्दतेच्या कारवाया करून गुन्हेगारीला चाप लावला. तथापि, काही राजकीय कार्यकर्त्यांची त्यातही विशेषत्वाने काँग्रेसच्या लोकांची कामे डावलल्याने त्यांचा गुरव यांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप होता. तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तोंडावर आहे. यासर्व पार्श्वभूमीवर गुरव यांची बदली झाल्याचे बोलले जात आहे.

नूतन डीवायएसपी डॉ. रणजित पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. कराड हे संवेदनशील शहर असल्यामुळे डॉ. पाटील यांना पोलिसिंगवर भर देऊन गुन्हेगारीवर नियंत्रण राखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. डॉ. पाटील यांनी यापूर्वी गडचिरोली, रायगड आणि नवी मुंबई विभागात सेवा बजावली आहे.

हेही वाचा -पाचगणीला 'ब' वर्ग पर्यटनस्थळ स्थळाचा दर्जा; विकासासाठी निधी मिळणार

ABOUT THE AUTHOR

...view details