महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे असूनही अद्याप अपूर्ण - डाॅ. हमीद दाभोलकर

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (20 ऑगस्ट) सात वर्षे पूर्ण झाली आहे. तरी अद्याप या हत्येचा तपास सीबीआयकडे असून देखील तो पूर्ण झालेला नाही, अशी खंत डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, ही गंभीर बाब असून समाजातील विवेकवादी लोकांना आजही धोका कायम आहे, असे त्यांनी सांगितले.

Dr. Hamid Dabholkar said cbi investigation of Narendra Dabholkar murder case is not complete yet
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणचा तपास सीबीआयकडे असून तो पूर्ण झालेला नाही- डाॅ.हमीद दाभोलकर

By

Published : Aug 20, 2020, 11:11 AM IST

Updated : Aug 20, 2020, 12:20 PM IST

सातारा - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासकार्याप्रमाणे सुशांतच्या आत्महत्या प्रकरणायाची परिणती होणार नाही, अशी आशा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे. तर, दाभोलकर यांच्या हत्येला सात वर्षे पूर्ण झाले असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे असून देखील तो अद्याप पूर्ण झालेला नाही, अशी खंत डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे असून तो पूर्ण झालेला नाही - डाॅ. हमीद दाभोलकर

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याच्या निर्णयानंतर या प्रकरणाशी निगडीत आतापर्यंत सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काल मुंबई पोलिसांना दिले. या निर्णयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला खात्री आहे की, महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करून चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल' असे पवार यांनी ट्विटरवरून व्यक्त केला आहे. तसेच, मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत 2014 मध्ये सुरु झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणती होणार नाही. अशी आशाही पवारांनी व्यक्त केली.

तर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (20 ऑगस्ट) सात वर्ष पूर्ण झाली आहे. तरी अद्याप या हत्येचा तपास सीबीआयकडे असून देखील तो पूर्ण झालेला नाही याची खंत डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली आहे. या हत्याकांडातील मारेकरी पकडले गेले असले तरी त्यामागील सूत्रधार मात्र अद्यापही मोकाटच आहेत. याची खूप वेदना आणि खंत माझ्या मनामध्ये आहे. गोविंद पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश या चारही खून प्रकरणांत एकच सूत्रधार आहेत असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. हे खरे असेल तर ही एक गंभीर बाब आहे. यामुळे देशभरातील विवेकवादी कार्यकर्त्यांना असलेला धोका हा कायम आहे. म्हणून लवकरात लवकर तपासामध्ये गती निर्माण होणे आवश्यक आहे आणि या यामागचे सूत्रधार गजाआड होणे गरजेचे आहे. मागील सहा महिन्यात या प्रकरणात जराही प्रगती झाली नाही ही खेदाची बाब आहे. असेही ते म्हणाले.

हेही वाचा- नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिन : 'त्यांनी' मारलेली हनुमान उडी म्हणजे...सहकाऱ्यांनी दिला आठवणींना उजाळा

या सर्व प्रकारानंतरही दाभोळकरांनी सुरू केलेल्या कामात जराही खंड पडलेला नाही. त्यांचे काम आजही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत 700 गुन्हे दाखल झाले आहेत. सामाजिक बहिष्काराविरोधातलाही कायदा संमत झाला. त्याअंतर्गत बारा ते पंधरा जात पंचायती बरखास्त झाल्या आहेत. Covid-19 च्या काळात अनेकांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली. त्यावेळी या कायद्याचा उपयोग झाला. मराठी,हिंदी, इंग्रजीसह आता इतरही भाषांमध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे साहित्य भाषांतरित केले जात आहे. विचार हे गोळीने मारता येत नाही हे यामुळे पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे. देशभरातील विज्ञानवादी संघटना, नागरिक एकत्र येत आजचा दिवस राष्ट्रीय वैज्ञानिक दिवस म्हणून विज्ञान प्रसार आणि प्रबोधनाचे कार्यक्रम करतात. जवळजवळ वीस राज्यात अशा प्रकारचे कार्यक्रम सुरू आहेत. अशीही माहिती त्यांनी दिली.

Last Updated : Aug 20, 2020, 12:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details