सातारा- सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख जातो. कारण २०१४ च्या मोदी लाटेतही राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले येथे मोठ्या फरकाने निवडून आले होते. त्यामुळे यंदा राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले हे विजयाची हॅट्रीक मारणार? की शिवसेना-भाजपचा अनपेक्षित विजय मिळवणार? याबद्दल लोक अंदाज लावत आहे, असे असले तरी असले तरी जिंकणार कोण हे गुरुवारीच स्पष्ट होणार आहे.
सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध शिवसेना भाजपचे नरेंद्र पाटील अशी लढत झाली. आता निवडणुकीचा निकाल येत्या गुरुवारी 23 मे रोजी जाहीर होणार आहे. या निकालाबाबत संपूर्ण जिल्ह्यात दोन्ही बाजूंकडून अनेक तर्कवितर्क आणि आकडेमोड जोडली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात उदयनराजे भोसले यांना मताधिक्याची चिंता लागली आहे. तर भाजप-शिवसेनेला नरेंद्र पाटील यांच्या अनपेक्षित विजयाची चाहूल लागली आहे.