महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराडमधील मॅरेथॉन बैठकीत दिवाकर रावतेंकडून शिवसैनिकांची काउघाडणी - कराड दिवाकर रावते लेटेस्ट न्यूज

कराडच्या विश्रामगृहात झालेल्या सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेनेचे उपनेते दिवाकर रावते यांनी सदस्य नोंदणी कमी झाल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील उपस्थित होते.

कराड सातारा लेटेस्ट न्यूज
कराड सातारा लेटेस्ट न्यूज

By

Published : Oct 31, 2020, 1:16 PM IST

कराड (सातारा) - कराडच्या विश्रामगृहात झालेल्या सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेनेचे उपनेते दिवाकर रावते यांनी सदस्य नोंदणी कमी झाल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील उपस्थित होते.

हेही वाचा -उद्धव ठाकरे सत्तेत आले आणि वारकऱ्यांचा विसर पडला; वारकरी प्रबोधन सेवा मंडळाचा आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची बैठक घेऊन राज्यात एकहाती भगवा फडकविण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते दिवाकर रावते हे दोन दिवसांपासून सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. गुरूवारी कोल्हापूर जिल्ह्याची बैठक झाल्यानंतर शुक्रवारी दिवसभर दिवाकर रावतेंनी कराडच्या शासकीय विश्रामगृहावर सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

दिवसभर चाललेल्या या बैठकीला दोन्ही जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुखांसह तालुका प्रमुख उपस्थित होते. संघटनात्मक बांधणीत पदाधिकारी आणि शिवसैनिक कमी पडल्याने रावते यांनी शिवसैनिकांची कानउघाडणी केली.

हेही वाचा -लॉकडाऊनमध्ये इंजिनिअरची गेली नोकरी : चहाचे दुकान टाकून जीवनात आणला गोडवा

ABOUT THE AUTHOR

...view details