साताराKunbi Caste Certificate: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण केल्यानंतर, राज्य सरकार जोमानं कामाला लागलय. सरकारनं कुणबी प्रमाणपत्रासाठी (Kunbi Certificate) राज्यभर मोहीम हाती घेतली. त्यामुळं सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द आल्या होत्या. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सुरू केलेल्या आंदोलनानंतर राज्यभरात कुणबीच्या नोंदी तपासणीला सुरुवात झाली आहे. सोमवारी सायंकाळी कराड तालुक्यातील पहिल्या कुणबी दाखल्याचं वितरण प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे (Atul Mhetre) आणि तहसीलदार विजय पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.
साताऱ्यात कुणबी दाखल्यांचं वितरण सुरू : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यभर आंदोलनांचा धडाका सुरू झाल्यानंतर सरकारने कुणबी नोंदी तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार महसूल यंत्रणेच्या पातळीवर दररोज कुणबीच्या नोंदी तपासल्या जात आहेत. कुणबी दाखल्यासाठी प्रस्ताव दाखल करणाऱ्यांच्या पुराव्यांची तपासणी करून आवश्यक ती पूर्तता पूर्ण करणाऱ्यांना कुणबी दाखले वितरणास सातारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली आहे.