सातारा -जिल्ह्यात गत काही दिवसांपासुन सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे मायणी, खटाव, माण, कोरेगाव या भागातील शेतकऱ्यांच्या फळबागा पुर्णपणे उध्दवस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
दुष्काळी तालुके म्हणुन राज्यात ओळख असलेल्या या तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी प्रशासनाला पाण्याचे टँकर सुरू करावे लागतात, अशी परिस्थीती आहे. या परिस्थितीतही काही शेतकरी द्राक्ष आणि डाळींबाचे मोठ्या प्रमाणात जोपासण्याचे कठीण काम करत आहेत. प्रसंगी या फळबागा जगवण्यासाठी पाणी विकत घेऊन ते या बागांचे संगोपण करतात.