सातारा कोयना धरणासह जिल्ह्यातील एकूण सात धरणांमधून ४५ हजार क्युसेक पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू Discharge of 45 thousand cusecs of water आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली seven dams in Satara district आहे. एकट्या कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाजांमधून सर्वाधिक ३२ हजार क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे.
नियोजनामुळे पुराचा धोका टळलाजिल्ह्यातील सर्वच धरणांच्या कार्यक्षेत्रात यंदा दमदार पाऊस पडला आहे. त्यामुळे सर्व धरणांमध्ये क्षमतेइतका पाणीसाठा Water dams situation in Satara झाला आहे. अजून पावसाचे दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सध्या धरणांमधून पाणी सोडले जात आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन पाणी सोडण्याचे नियोजन केल्यामुळे जिल्ह्यात यंदा पुराचा फारसा धोका निर्माण झाला नाही.
कोयनेच्या विसर्गाकडेअलमट्टी धरण व्यवस्थापनाचे असते लक्षकोयना धरण पाणलोट क्षेत्रातील Rain near Koyna Dam पाऊस, धरणातील पाणीसाठा आणि विसर्गाकडे सांगली, जयसिंगपूर, शिरोळ या तालुक्यांसह कर्नाटकचे लक्ष असते. कोयनेतून सोडलेल्या पाण्यामुळे पुराची परिस्थिती गंभीर होते. कोल्हापूरसह शिरोळ तालुक्याला पुराचा मोठा फटका बसतो. त्यामुळे कोयना धरणातील विसर्गानुसार अलमट्टीच्या व्यवस्थापनाला विसर्गाचा निर्णय घ्यावा लागतो.