सातारा - पूरग्रस्त परिस्थितीचा सामना करण्यासाठी हे सरकार पात्र नसल्याचे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला. मात्र, आम्ही सर्वोतोपरी मदत करु असे आश्वासन धनंजय मुंडेंनी यावेळी दिले.
पूरग्रस्त असणाऱ्या सातारा आणि सांगली जिल्ह्याची आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह धनंजय मुंडेंनी पाहणी केली. यावेळी बोलताना मुंडेनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. लोकांचा आक्रोश अजूनही कानात घुमत असल्याचे मुंडे यावेळी म्हणाले. हे सरकार पूरग्रस्तांना सर्वोतोपरी मदत करण्यास पात्र नसल्याचेही मुंडे म्हणाले.