महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'धैर्यशील कदम हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार' - कराड उत्तर उमेदवार धैर्यशील कदम

कराड उत्तरमधील अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

विक्रम पावसकर

By

Published : Oct 19, 2019, 3:05 PM IST

सातारा- कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम हेच आहेत. मनोज घोरपडे यांचा भारतीय जनता पक्षाशी संबंध नाही, असा खुलासा भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केला आहे.

हेही वाचा -मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील देणार देशमुख यांना पाठिंबा..?

कराड उत्तरमधील अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असल्याने घोरपडे यांचा भाजपशी काडीचाही संबंध राहिलेला नाही. कराड उत्तरमध्ये धैर्यशील कदम हेच शिवसेना-भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत.

हेही वाचा -'कराडकरांच्या मानगुटीवरचे भूत आम्ही उतरवले'

घोरपडे यांनी राजीनामा दिल्याची आणि पक्षाने तो मंजूर केल्याचे जनतेला कळावे. त्यांच्यातील संभ्रम दूर व्हावा, म्हणून हा खुलासा करत असल्याचे पावसकर म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details