सातारा - देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात लवकरात लवकर सरकार सत्तेत यावे, यासाठीच्या हालचाली विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर सुरू झाल्या होत्या, ( Legislative Council elections ) असा गौप्यस्फोट भाजपचे सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ( BJP MLA ShivendraRaje Bhosale ) यांनी केला आहे. राज्यात नेमके कोणाचे सरकार स्थापन होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
तर मध्यवर्ती निवडणुकांसाठी आम्हीही तयार-एकनाथ शिंदेंसह सातारा जिल्ह्यातील महेश शिंदे व शंभूराज देसाई हे शिवसेना आमदार नॉट रिचेबल असल्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, या गोष्टी न्यूजच्या माध्यमातून ऐकल्या आहेत. मुळात हा दुसऱ्या पक्षांचा विषय आहे, त्यांच्या प्रमुख नेत्यांनी याची माहिती देणे गरजेचे आहे.