सातारा:एक मुख्यमंत्री, एक पूर्वीचा मुख्यमंत्री आणि आताचा उपमुख्यमंत्री, त्यात आणखी एक उपमुख्यमंत्री झाला. त्याला आता मुख्यमंत्री व्हायचे आहे. एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत; पण इथे तीन तलवारी एका म्यानात आहेत, असा खोचक टोलाही बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदाची मागणी:बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ जास्त असल्यामुळे विरोधी पक्षनेते पद आम्हाला मिळावे, अशी मागणी आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे करणार आहोत. ही परिस्थिती का आली? एका वर्षात दोनदा पक्ष फोडण्यासारखी घटना आजपर्यंत कधी झालेली नाही. राज्याच्या राजकारणात अशी गोंधळाची परिस्थिती कधीही पाहिली नाही.
राष्ट्रपती राजवट लागू करा:राज्यात सगळीकडे भ्रष्टाचार बोकाळला असून सरकारचे जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोपही बाळासाहेब थोरात यांनी केला. या सरकारबद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे. आमदारांमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. त्यामुळे राज्यात असे सरकार नको, त्यापेक्षा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीही थोरात यांनी केली.
फुटीमुळे विरोधकांच्या संख्येत घट:विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधकांची संख्या कमी झाली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीतही बंडाळी झाली. त्याचा परिणाम विरोधकांच्या संख्येवर झाला आहे. विरोधी पक्ष नेत्याशिवाय अधिवेशन होत असल्याने अधिवेशनात विरोधक सत्ताधार्यांची कशी कोंडी करणार, हा देखील प्रश्न आहे.
सरकार मंत्रिमंडळ विस्तारात गुंग: राज्यातील युतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सामील झाल्यानंतर आता महायुतीचे सरकार राज्यात काम करत आहे. अजित पवार आणि त्यांच्या आठ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेऊनही खाते दिले नसल्यामुळे विरोधकांकडून महायुती सरकारला टार्गेट केले जात आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी खातेवाटप करून दाखवा न्याय द्यावा. ज्यांना मंत्रिपदाची आशा दाखवून त्यांना पक्षातून फोडले. आपल्यासोबत घेऊन गेले. शिवसेना सोडून गेलेल्यांची अशीच परिस्थिती झाली आहे. भाजपमध्ये देखील हीच परिस्थिती झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना नुकसान भरपाई दिली गेली नाही. अनेक ठिकाणी दुबारा पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. मात्र, सरकार मंत्रिमंडळ विस्तारात गुंग आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
हेही वाचा:
- CM Eknath Shinde : सरकार पडेल पडेल बोलू नका नाहीतर....; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना थेट इशारा, Watch Video
- Monsoon Session 2023 : विरोधी पक्ष आहे कुठे? अजित पवार आमच्याकडे आल्याने...; सत्ताधाऱ्यांची विरोधकांवर टीका
- Jayant Patil on Opposition Leader : विरोधी पक्षनेते पद कोणाकडे? जयंत पाटलांनी स्पष्ट सांगितले, आम्ही फक्त कागदावरच....