महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यातील 'ग्रेड सेपरेटर'चे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते लोकार्पण, म्हणाले वाहतूक कोंडी फुटेल

साताऱ्यातील ग्रेड सेपरेटरचे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते म्हणाले या ग्रेड सेपरेटरमुळे वाहतूक कोंडी फुटेल.

dedication-of-grade-separator-from-satara-by-ramraje-naik-nimbalkar
साताऱ्यातील 'ग्रेड सेपरेटर'चे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते लोकार्पण, म्हणाले वाहतूक कोंडी फुटेल

By

Published : Jan 29, 2021, 5:06 PM IST

सातारा -पोवई नाक्यावर सुमारे ७ कोटी रुपये खर्चुन बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरचे लोकार्पण विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आज झाले. 'सातारच्या वाहतुकीतील अनेक वर्षांची समस्या या ग्रेड सेपरेटरमुळे सुटेल. या ग्रेड सेपरेटरची देखभाल व्यवस्था उत्तम ठेवावी, अशी अपेक्षाही त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केली.

साताऱ्यातील 'ग्रेड सेपरेटर'चे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते लोकार्पण, म्हणाले वाहतूक कोंडी फुटेल

याप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा आदी उपस्थित होते.

सीसीटिव्ही कॅमेरे लावा -

सातारा शहरातील नविन नागरी सुविधा ग्रेड सेपरेटरच्या माध्यमातून मिळणार आहे. पोलिस विभागाच्या माध्यमातून या ग्रेड सेपरेटरमध्ये लोकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत, अशी अपेक्षा रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.

हालचालींवर राहणार लक्ष -

पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, अलिकडच्या काळात वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतुकीच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यातूनच ग्रेड सेपरेटरची संकल्पना पुढे आली. केंद्र शासनाने 60 कोटी व राज्य शासनाने 16 कोटी दिले आहेत. ग्रेडसेपरेटरचे काम चांगल्या पध्दतीने झाले असून देखभाल व दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना सातारा नगरपरिषदेला दिल्या आहेत. ग्रेडसेपरेटरमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने सी सी टि.व्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. याचे नियंत्रण पोलिस विभागाबरोबरच स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मोठे स्क्रिन लावण्यात व्यवस्था करावी. यामुळे आतील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

यावेळी शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील यांची भाषणे झाली. कार्यक्रमास विविध विभागाचे अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details