कराड (सातारा) - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी सव्वा आठ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत. फक्त धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कोयना धरणाचे वक्र दरवाजे बंद; पायथा वीज गृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग - कोयना धरण अपडेट
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे गुरूवारी सकाळी सव्वा आठ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत. फक्त धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
कोयना धरणाचे वक्र दरवाजे बंद; पायथा वीज गृहातून २१०० क्युसेक विसर्ग
कोयना धरणात सध्या ९१.६३ टीएमसी पाणीसाठा आहे. पावसाचा जोर ओसरल्याने धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे बुधवारी दीड फुटांवर स्थिर ठेवलेले धरणाचे सहा वक्र दरवाजे गुरुवारी सकाळी बंद करण्यात आले.
धरणाचा पायथा वीजगृह सुरू ठेऊन २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. विसर्ग कमी झाल्यामुळे नद्यांची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे.