महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Former BJP MLA : भाजपच्या 'या' माजी आमदारांच्या बंगल्याच्या आवारात आढळला कुजलेला मृतदेह - former BJP MLA Kantatai Nalawade

भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे ( former BJP MLA Kantatai Nalawade ) यांच्या सातार्‍यातील वाढे गावच्या हद्दीत आरफळ फाट्याजवळच्या बंद बंगल्याच्या आवारात कुजलेला मृतदेह ( Dead body in premises of Kantatai Nalawade bungalow ) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Dec 31, 2022, 4:39 PM IST

सातारा - भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे ( former BJP MLA Kantatai Nalawade ) यांच्या सातार्‍यातील वाढे गावच्या हद्दीत आरफळ फाट्याजवळच्या बंद बंगल्याच्या आवारात कुजलेला मृतदेह आढळून ( Dead body in premises of Kantatai Nalawade bungalow ) आल्याने खळबळ उडाली आहे. सध्या या बंगल्यात कोणीही वास्तव्यास नाही. या घटनेची माहिती मिळताच सातारा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. सध्या पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरल्याचा संशय

अर्धवट पुरलेला मृतदेह आढळल्याने खळबळ -सातारा शहरानजीकच्या वाढे गावच्या हद्दीत आरफळ फाट्याजवळ भाजपच्या माजी आमदार कांताताई नलावडे यांचा बंगला आहे. सध्या बंगल्यात कोणीही वास्तव्यास नसल्यामुळे अनेक दिवसांपासून तो बंद अवस्थेत होता. या बंगल्याच्या आवारात अर्धवट पुरलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी बघ्यांची देखील मोठी गर्दी झाली होती. खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पुरण्याचा प्रयत्न केला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

सातारा ग्रामीण पोलिसांकडून तपास सुरू - बंद बंगल्याच्या आवारातील मातीमध्ये अर्धवट पुरलेला मृतदेह आढळून आल्याची माहिती सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक विश्वनाथ घोड़के, पोलीस अंमलदार तोरमडल हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बघ्यांची घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दीला पांगवून घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह कुजलेला असल्यामुळे मृतदेहाची ओळख पटलेली नाही. अज्ञाताचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुरला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details