महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dead Body found in Shivshahi bus : धक्कादायक! शिवशाही बसमध्ये आढळला कुजलेला मृतदेह - शिवशाही बसमध्ये मृतदेह आढळला

कराड बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये ५० वर्षांच्या बेवारस पुरूषाचा सडलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Dead Body found in Shivshahi bus
Etv Bharat

By

Published : Feb 8, 2023, 11:09 PM IST

सातारा : कराड बसस्थानकात पाच दिवसांपासून एका बाजूला उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये ५० वर्षांच्या बेवारस पुरूषाचा सडलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत.

पाच दिवसांपासून मृतदेह बसमध्ये : कराड बसस्थानकात शिवशाही बस एका बाजूला उभ्या असतात. अशीच एक बस पाच दिवस एका जागी उभी होती. या बसमधील ड्रायव्हर केबीनमध्ये एका पुरूषाचा मृतदेह आढळला. बस उभी करून चालक निघून गेल्यापासून बस जाग्यावरच उभी होती. त्यामुळे ही घटना लवकर उघडकीस आली नाही.

पोलीस कर्मचाऱ्याने केला खर्च : शिवशाही बसमध्ये मृतदेह आढळला. एसटी महामंडळाशी शिवशाही बसचा संबंध नसल्याने एसटीच्या अधिकाऱ्यांनी आपले हात वर केले. त्यामुळे बसस्थानक पोलीस चौकीतील पोलीस नाईक एम. एस. बुधावले यांनी स्वतः पाच हजार रुपये खर्च करून बेवारस मृतदेह कपड्यात गुंडाळून वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील शवागारात ठेवला. पोलीस नाईक कुलदीप कोळी त्यांच्या मदतीला आले.

कराड डेपोचा कारभार राम भरोसे :कराड डेपोमध्ये अनेक शिवशाही बस बंद अवस्थेत उभ्या आहेत. या बसचे चालक-वाहक कित्येक दिवस बसकडे फिरकत नाहीत. बसमधे पाच दिवस मृतदेह पडून होता. मात्र कोणाला काणकूण लागली नाही. या सर्व प्रकारावर डेपो मॅनेंजरने देखील हात वर केले. त्यामुळे एसटीच्या अधिकाऱ्यांचा गलथानपणा समोर आला आहे. एकूणच कराड आगाराचा कारभार राम भरोसे सुरू असल्याचे पाहायला मिळाले.

फिर्याद देण्यास टाळाटाळ : कराड बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मृतदेह आढळल्यानंतर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासही एसटी अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. शिवशाही बसचा आणि आमचा काय संबंध, असे म्हणत एसटीचे अधिकारी हात झटकत होते. आगारामध्ये ही घटना घडल्यामुळे एसटी आगाराचीच जबाबदारी असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर साळुंखे नावाच्या अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

हेही वाचा :Mumbai Crime: आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीसमोर हस्तमैथून करणे कार चालकाला पडले भारी....वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details