महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विजेच्या धक्क्याने सोसायटीच्या अध्यक्षाचा मृत्यू; पत्नीसह तिघांचे वाचले थोडक्यात प्राण

सुनील शंकरराव पाटील आणि त्यांचे चुलते किसन पाटील हे सकाळी शेतात पिकाला पाणी ( Electricity shock death in Satara ) देत होते. शेतातील खांबावरील विजेची बंद तार विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेवर तुटून पडली. त्यामुळे शेतातील पाण्यात वीजेचा विद्युत प्रवाह उतरला. त्यामुळे सुनील पाटील यांना शाॅक लागून त्यांचा जागीच ( Sunil Patil death due electricity ) मृत्यु झाला.

सोसायटीच्या अध्यक्षाचा मृत्यू
सोसायटीच्या अध्यक्षाचा मृत्यू

By

Published : Mar 5, 2022, 5:28 PM IST

सातारा -शेतात पिकाला पाणी देत असताना चुलता-पुतण्याला विजेचा जबर शॉक ( Electricity shock in farm ) लागला. यामध्ये पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चुलता जखमी झाल्याची घटना कराड तालुक्यातील हेळगावमध्ये घडली आहे. सुनील शंकरराव पाटील, असे मृताचे ( Sunil Patil death in Satara ) नाव आहे. ते विकास सेवा सोसायटीचे अध्यक्ष होते. त्यांचे चुलते किसन पाटील हेदेखील शाॅक लागून जखमी झाले आहेत. तर पत्नी आणि चुलत भाऊ सुदैवाने बचावले.

सुनील शंकरराव पाटील आणि त्यांचे चुलते किसन पाटील हे सकाळी शेतात पिकाला पाणी ( Electricity shock death in Satara ) देत होते. शेतातील खांबावरील विजेची बंद तार विद्युत प्रवाह सुरू असलेल्या तारेवर तुटून पडली. त्यामुळे शेतातील पाण्यात वीजेचा विद्युत प्रवाह उतरला. त्यामुळे सुनील पाटील यांना शाॅक लागून त्यांचा जागीच ( farmer death due electricity ) मृत्यु झाला.

हेही वाचा-CCTV Footage : साफसफाई करण्याच्या वादातून बांधकाम व्यावसायिकला बेदम मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद

शॉक लागून चुलताही जखमी
पुतण्या सुनील हा घरी न आल्यामुळे त्याला शोधण्यासाठी पत्नी नंदा, चुलते किसन पाटील आणि चुलत भाऊ अनिल हे शेतात गेले. त्यावेळी चुलत्यांनाही वीजेचा धक्का बसला. त्यात ते जखमी झाले. तर सतर्कतेमुळे पत्नी आणि चुलत भाऊ बचावले. सोसायटी अध्यक्षांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे समजताच हेळगाव परिसरावर शोककळा पसरली.

हेही वाचा-Nashik Accidental Death : रुग्णालयातील लिफ्टच्या खड्ड्यात पडून तरुणाचा मृत्यू

वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार...
सुनील पाटील यांच्या शेतातील खांबावरून रस्त्यापलिकडील खांबावर गेलेली वीजेची तार काढण्याबाबत वीज वितरण कंपनीला तोंडी व लेखी कळवले होते. मात्र, ती तार काढण्यात आली नाही. ती तार तुटून विद्युत वाहक तारेवरून खाली लोंबकळत होती. त्या तारेतील वीज प्रवाह पाण्यात उतरल्याने ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप सुनील पाटील यांचे कुटुंबीय आणि हेळगाव ग्रामस्थांनी केला आहे.

हेही वाचा-Crime News : वकिलाच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा; महिलेच्या गळ्यावर सुरा ठेवत दागिन्यांची लूट

ABOUT THE AUTHOR

...view details