सातारा :जेली चॉकलेट घशात अडकून चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक (Baby Death Milk Entering Respiratory Tract) मन हेलावणारी घटना कराड तालुक्यातील कवठे गावात घडली आहे. आई अंगावर दूध पाजत असताना दूध श्वसन नलिकेत गेल्याने अडीच महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू झाला (Baby Death Satara) आहे. मुलीचे अद्याप बारसेही (Karad Baby Death) झालेले नव्हते. या घटनेमुळे यादव कुटुंबीयांना जबर धक्का (Baby Death Milk Entering) बसला आहे.
रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू :उंब्रज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कवठे (ता. कराड) येथील स्वाती कृष्णत यादव यांची अडीच महिन्यांपूर्वी प्रसूती होऊन त्यांनी मुलीला जन्म दिला. मुलीचे अद्याप बारसेही झाले नव्हते. अशातच सोमवारी रात्री मुलीला अंगावर पाजत असताना मुलीच्या श्वसन नलिकेत दूध गेल्याने तिला ठसका लागला. तसेच उलटी होऊन ती बेशुद्ध पडली. कुटुंबीयांनी तातडीने तिला कराडच्या कृष्णा रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्ट्रांनी तिला मृत घोषित केले.
चिमुकलीच्या मृत्यूचा कुटुंबीयांना जबर धक्का :केवळ अडीच महिने वयाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने यादव कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे. उंब्रज पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलिस नाईक वैभव डोंगरे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, चिमुकलीच्या मृत्यूची सातारा जिल्ह्यातील ही सलग दुसरी घटना आहे. सातारा शहरामध्ये सोमवारी दीड वर्षाच्या मुलीचा घशात जेली चॉकलेट अडकून मृत्यू झाला होता. अशा घटना टाळण्यासाठी पालकांनी मुलांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे.