माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा : तेलंगणाचे मुख्यमंत्री संपूर्ण कॅबिनेटसह विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत. त्यामुळे यंदाच्या आषाढीला राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात कोणीही येऊ शकत. भक्तीभावाने जरूर या, पण राजकारण करण्यासाठी कोणी येऊ नये, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
भक्तीमय सोहळ्यात राजकारण नको:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज कराड दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसार माध्यमांनी के. चंद्रशेखर राव यांच्या पंढरपूर दौऱ्याबद्दल फडणवीस यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. फडणवीस म्हणाले की, पंढरपूरला दर्शनासाठी कोणीही येऊ शकत. भक्तीभावाने जरूर पंढरपूरला यावे, परंतु राजकारणासाठी कोणी येऊ नये, अशा सूचक शब्दांत फडणवीस यांनी के. चंद्रशेखर राव यांना भक्तीमय सोहळ्यात राजकारण न आणण्याचा सल्ला दिला आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री संपूर्ण कॅबिनेटसह विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत. पंढरपुरात कोणीही येऊ शकत. भक्तीभावाने जरूर या, पण राजकारण करण्यासाठी कोणी येऊ नये - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
तेलंगणाची संपूर्ण कॅबिनेट येणार पंढरपुरात : 'अब की बार किसान सरकार’चा नारा देत भारत राष्ट्र समितीचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पूर्वीच पक्ष विस्ताराची करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील निवडणुका पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. याच धर्तीवर तेलंगणाच्या मुख्यमंत्री के सीआर हे संपूर्ण कॅबिनेटसह विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत.
दुष्काळी भागातील योजनांना निधी देणार: सातारा जिल्ह्यातील टेंभू, उरमोडी आणि जिहे-कठापूर या योजनांना गती आणि निधी देण्याचा निर्णय घेतल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या योजनांची उर्वरित कामे गतीने पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच एमआयडीसीच्या संदर्भातही बैठक घेतली असून, एमआयडीसींचे प्रश्नही लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री केसीआर यांचे अभूतपूर्व प्रयोग:तेलंगणा तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी तेलंगणामध्ये जे काही प्रयोग केले, ते अभूतपूर्व प्रयोग आहेत. त्यांचा प्रचंड गाजावाजा होत आहे. शेतीला मोफत वीज आणि मोफत पाणी या दोन गोष्टींमुळे महाराष्ट्रातील असंख्य शेतकरी त्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत. म्हणूनच अनेक माजी आमदार आज प्रामुख्याने केसीआर यांच्या भारत पक्षामध्ये सहभागी होत आहेत. माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके हे सुद्धा त्यांच्याकडे आकर्षित झाले आहेत. त्यांना असे वाटते, के सी आर यांच्या योजनांमुळे शेतकरी आकर्षित होतील. त्यांना मतदान देऊन निवडून आणतील. या एकाच कारणासाठी हे लोक आज त्यांच्याकडे जात आहेत.
हेही वाचा -
- BRS Maharashtra या कारणामुळे महाराष्ट्रातील माजी आमदार बीआरएसमध्ये घेत आहेत प्रवेश
- BRS भारत राष्ट्र समितीची महाराष्ट्रात पाय रोवण्यास सुरुवात विदर्भाकडे असणार सर्वाधिक लक्ष
- Devendra Fadnavis Reaction लोकांच्या मनातून सावरकर काढू शकत नाही देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर हल्लाबोल