महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घड्याळालाही लाजवेल असा असतो वारकऱ्यांचा 'दिनक्रम' - vithal

एकंदरीतच ठरलेला मुक्काम, सकाळ, सकाळची आरती, प्रवासाला सुरुवात, दुपारचा विसावा आणि रात्रीचा मुक्काम परत तोच दिनक्रम असे करत 18 दिवसात वारकरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत जीवनाचा आनंद लुटतात.

घड्याळालाही लाजवेल असा असतो वारकऱ्यांचा 'दिनक्रम'

By

Published : Jul 8, 2019, 9:55 PM IST

सातारा - सध्या आषाढी वारी सुरू असून लाखो वारकरी पायी प्रवास करत पंढरपूरच्या वेशीवर येऊन ठेपलेत. ठरलेल्या वेळा, विसावा आणि मुक्काम यांचा समतोल साधत वारकरी आळंदी ते पंढरपूर असा 250 किलोमीटरचा प्रवास अगदी सुखरुप पार पाडतात. या प्रवासात वारकऱ्यांचा दिनक्रम ठरलेला असतो. काय असतो त्यांचा दिनक्रम जाणून घेऊयात.

घड्याळालाही लाजवेल असा असतो वारकऱ्यांचा 'दिनक्रम'

वारकऱ्यांना राहण्यासाठी पालाची व्यवस्था केलेली असते. पालावर संध्याकाळी किर्तन झाले, की जेवणाची व्यवस्था केलेली असते. दिवसभर चालुन थकल्यामुळे वारकरी ठिक अकराला झोपी जातात. सकाळी ठिक ६ वाजता अंघोळ करून सकाळचा काकडा आरती करून वारकरी पालखी सजवुन पुढील मुक्कामासाठी रवाना होतात. यात रस्त्याच्या दुतर्फा असणारे फळ तसेच खाद्य पदार्थ, चहा पाणी तसेच अंघोळीपासून ते दाढीच्या नाभिकापर्यंत सर्व गोष्टी या ठिकाणी असतात.

माऊलींचा दिनक्रम कसा असतो?


माऊलींची पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आधीच सजवली जाते. सकाळी माऊलींच्या पादुकांची आरती साडेपाचला केली जाते. ज्याला काकडा आरती म्हटले जाते. सकाळी सहाला माऊलींच्या प्रवासाला सुरुवात करतात. मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर मानाच्या मानकऱ्यांच्या हस्ते मानाची पुजा आणि आरती केली जाते. संध्याकाळी ठिक १० वाजता ही आरती संपन्न होते.

माऊलींच्या वारीत सुमारे २ हजाराच्यावर दिंड्या चालतात. या वारकऱ्यांची सोय ही दिंडी चालकांकडुन केली जाते. मानाच्या 27 दिंड्या माऊलींच्या रथाच्या पुढे व मागे असतात. हे वारकरी माऊलींच्या पालखीबरोबर प्रवास करतात. संध्याकाळी पालखी ज्या ठिकाणी मुक्कामाला असते. त्या ठिकाणी भारुड, लोककला आणि विविध कार्यक्रम पार पडतात. त्याला वारकऱ्यांची आवर्जुन हजेरी असते. एकंदरीतच ठरलेला मुक्काम, सकाळ, सकाळची आरती, प्रवासाला सुरुवात, दुपारचा विसावा आणि रात्रीचा मुक्काम परत तोच दिनक्रम असे करत 18 दिवसात वारकरी आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत जीवनाचा आनंद लुटतात.

ABOUT THE AUTHOR

...view details