महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Daring House Burglary : कुटुंबीय परगावी गेल्याची संधी साधत बंद घरात टाकला दरोडा; 25 तोळ्यांच्या दागिन्यांवर हात साफ - Theft of jewelery worth 25 tolas

शहरातील मध्यवस्तीत चोरट्यांनी धाडसी घरफोडी (Daring house burglary in Satara) करून तब्बल २५ तोळ्याचे दागिने लंपास (Theft of jewelery worth 25 tolas) केल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबीय परगावी गेल्यामुळे घर बंद होते. ही संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश (breaking the door of the locked house) केला. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात (CCTV footage seized ) घेतले असून त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Satara Crime), (Satara News)

Daring House Burglary
साताऱ्यात धाडसी घरफोडी

By

Published : Oct 31, 2022, 8:54 PM IST

सातारा : शहरातील मध्यवस्तीत चोरट्यांनी धाडसी घरफोडी (Daring house burglary in Satara) करून तब्बल २५ तोळ्याचे दागिने लंपास (Theft of jewelery worth 25 tolas) केल्याची घटना समोर आली आहे. कुटुंबीय परगावी गेल्यामुळे घर बंद होते. ही संधी साधून चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश (breaking the door of the locked house) केला. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात (CCTV footage seized ) घेतले असून त्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (Satara Crime), (Satara News)

साताऱ्यात धाडसी घरफोडी


कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश -सातारा शहरातील कमानी हाैदाच्या परिसरातील गुरुवार पेठेत शिवाजीराव जेधे यांच्या घरात रविवारी रात्रीच्या सुमारास ही चाेरी झालेली आहे. जेधे कुटुंबीय सुट्टीनिमित्त परगावी गेल्याचा फायदा घेत चाेरट्यांनी घराचा कडी कोयंडा ताेडून घरात प्रवेश करून प्राथमिक माहितीनुसार २५ ताेळ्याचे दागिने चोरीस गेल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, गेली काही दिवस सातारा शहरात आणि जिल्ह्यात घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.


तपासासाठी पोलीस पथके रवाना -घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन चोरट्यांच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. लवकरच गुन्हा उघडकीस आणण्यात यश येईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details