सातारा - दहिवडी पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत आज येथील फलटण चौक व मार्डी चौकात मुंबईहून आलेल्या १४ चारचाकी वाहने पोलिसांनी पकडली. यातील ७९ प्रवाशांना ताब्यात घेण्यात आले. तर गुजरातमधील सुरत तसेच भिवंडी येथून मालवाहू ट्रकमधून आलेल्या ३७ प्रवाशांनाही ताब्यात घेतले आहे.
कोरोना : मुंबईहून आलेल्या 79 नागरिकांना दहिवडी पोलिसांनी पकडले.. सर्वजण आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली - दहिवडी पोलीस
नाकाबंदीत फलटण चौक व मार्डी चौकात मुंबईहून आलेल्या १४ चारचाकी वाहने पोलिसांनी पकडली. यातील ७९ जणांना ताब्यात घेण्यात आले. तर गुजरातमधील सुरत तसेच भिवंडी येथून मालवाहू ट्रकमधून आलेल्या ३७ प्रवाशांनाही ताब्यात घेतले गेले. सर्वजण आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली आहेत.
पकडण्यात आलेल्या सर्वांवर भारतीय दंड विधान कलम २६९, १८८ अन्वये शासनाचे निर्बंध डावलून आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल तसेच संसर्गजन्य आजार पसरविण्याचा धोका माहिती असतानाही फिरल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र दहिवडीच्या उपकेंद्र मार्डीतील कर्मचाऱ्यांनी या सर्वांची नोंद घेतली असून त्यांना दहिवडी येथील सामाजिक न्याय विभागाच्या मुलांच्या शासकीय वसतीगृहात आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. परगावावरुन येणारे कोणतेही वाहन सोडले जाणार नाही. वाहन चालक, मालक यांच्यासह प्रवाशांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.