महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सातारा जिल्ह्यात संचारबंदीमध्ये शिथिलता, ६ जूनच्या मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची घटती संख्या पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीमध्ये काहीशी शिथिलता दिली आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील किराणा, भाजी, मास-मच्छी, बेकरी यांना काही प्रमाणात मुभा राहील. 50 टक्के क्षमतेने बस वाहतूकही सुरू होणार आहे. आज (६ जून) मध्यरात्रीपासून नवे निर्बंध व सवलती लागू होतील.

सातारा जिल्ह्यात संचारबंदीमध्ये शिथिलता, ६ जूनच्या मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू
सातारा जिल्ह्यात संचारबंदीमध्ये शिथिलता, ६ जूनच्या मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू

By

Published : Jun 7, 2021, 2:20 AM IST

सातारा -जिल्ह्यात कोरोना रुग्णांची घटती संख्या पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीमध्ये काहीशी शिथिलता दिली आहे. याशिवाय अत्यावश्यक सेवेतील किराणा, भाजी, मास-मच्छी, बेकरी यांना काही प्रमाणात मुभा राहील. 50 टक्के क्षमतेने बस वाहतूकही सुरू होणार आहे. आज (६ जून) मध्यरात्रीपासून नवे निर्बंध व सवलती लागू होतील. शनिवार-रविवार मात्र, संचारबंदीसह सर्व निर्बंध कायम असतील.

सातारा जिल्ह्यात संचारबंदीमध्ये शिथिलता, ६ जूनच्या मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू
या अत्यावश्यक सेवांना सवलतरुग्णालय, दवाखाने, लसीकरण केंद्र, औषध दुकाने, जनावरांची हॉस्पिटल्स, ॲनिमल केअर शेल्टर्स व पेट, बँका, वनविभागाने घोषित केल्यानुसार वनाशी संबंधित सर्व कामकाज, किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, मास -मच्छी, अंडी दुकाने इत्यादींची सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने यांना सवलत देण्यात आली आहे.अशी असेल सवलतजिल्ह्यात सोमवार ते शुक्रवार सायंकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत, तसेच आठवड्याचे शेवटी म्हणजेच शनिवार - रविवारी पूर्ण कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक बाबीची दुकाने, आस्थापना या सकाळी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत. औषध दुकानांना सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत परवानगी.खुली मैदाने, जागा येथे धावणे, सायकल चालवण्यास, क्रीडाविषयक बाबींना सोमवार ते शुक्रवार पहाटे पाच ते सकाळी नऊ परवानगी. शनिवार-रविवार मात्र मनाई.आयसोलेशन बबलमध्येच चित्रीकरण व वास्तव्य करणे बंधनकारक

लग्नसमारंभाला दोन तासांसाठी पंचवीस लोकांच्या मर्यादित तहसीलदारांची परवानगी
20 नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यविधी/ दशक्रिया विधी करता येईल
राहण्याची व्यवस्था बांधकामाच्या ठिकाणी असेल अशी बांधकामे
केस कर्तनालय, सौंदर्य केंद्रे येथे फक्त लस घेतलेल्या ग्राहकांसाठी दुपारी दोन वाजेपर्यंत परवानगी
सार्वजनिक व परिवहन बसेस 50% क्षमतेने धावतील. खाजगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांचा आंतरजिल्हा प्रवास नियमित
जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू राहतील. बाजार समित्यांच्या ठिकाणी फक्त घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांना तेथे जाऊन माल घेता येईल

हे राहणार बंद

अत्यावश्यक नसलेली दुकाने, मॉल, सिनेमागृहे, नाट्यगृहे.
हॉटेल, रेस्टॉरंट ही केवळ पार्सल घरपोचसाठी चालू. याठिकाणी बसण्यास परवानगी नाही.
लॉजिंग सुविधा पूर्णपणे बंद
शासकीय कार्यालय व ज्या खाजगी कार्यालयांना परवानगी देण्यात आली आहे अशांना 25% क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी
सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रार्थनास्थळे, करमणूक कार्यक्रम, मेळावे, क्रीडा स्पर्धा, व्यायाम शाळा बंद.

ABOUT THE AUTHOR

...view details