सातारा - पर्यटकांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये गेल्या आठ महिन्यात प्रथमच पर्यटकांनी गर्दी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही गर्दी कमी आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पर्यटक महाबळेश्वरला येत असल्यामुळे व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे. तसेच येणाऱ्या काळात ही गर्दी आणखी वाढेल असा अंदाज स्थानिक व्यवसायिकांनी व्यक्त केला आहे.
ख्रिसमस व नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर सज्ज झाले असून, सलग सुटी आल्याने पर्यटकांनी महाबळेश्वरमध्ये गर्दी केली आहे. महानगरपालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी असल्यामुळे अनेकांनी सुटीसाठी महाबळेश्वरची निवड केली आहे. थंड हवेच्या निसर्गरम्य पर्यटनस्थळी
पर्यटकांची मांदियाळी अनुभवायास मिळत असून, वेण्णा लेक परिसरातील हिमकण आणि गुलाबी थंडीचा पर्यटक कुटुंबीयांसह आनंद घेत आहेत. नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेकवर पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. घोडेस्वारी आणि चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची पाचगणी-महाबळेश्वरला नेहमीच पसंती असते.
कोविडच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची खबरदारी