महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतीचे पारंपरिक गणित बिघडले, उत्पन्नात घट होण्याची शक्यता - crops affecting due to climate change

पावसामुळे शेतकऱ्याचे शेतीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले. मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन उशिरा उघडल्याने शेतांमध्ये पाणी साचून राहिले. काही ठिकाणी पाण्याचा निचरा झाला असला तरी बहुतांशी ठिकाणी अजूनही शेतात मशागत करण्यायोग्य वाफसा झाला नाही. त्यामुळे शेतीची कुठलीच कामे करणे अशक्य झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

satara
शेतपिकांवर वातावरणाचा परिणाम

By

Published : Nov 29, 2019, 2:19 PM IST

सातारा - पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकऱ्यांची शेती कामासाठीची धांदल उडाली आहे. मात्र, यंदा ऋतुचक्र बिघडल्याने ऑक्टोबरमधील उन्हाचा तडाखा नोव्हेंबरमध्ये जाणवत असून थंडीची चाहूलही जाणवू लागली आहे. या सर्वांचा परिणाम पिकांवर झाला असून शेतीचे पारंपारिक गणित बिघडले आहे.

शेतपिकांवर वातावरणाचा परिणाम

पावसामुळे शेतकऱ्याचे शेतीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले. मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन उशिरा उघडल्याने शेतांमध्ये पाणी साचून राहिले. काही ठिकाणी पाण्याचा निचरा झाला असला तरी बहुतांशी ठिकाणी अजूनही शेतात मशागत करण्यायोग्य वाफसा झाला नाही. त्यामुळे शेतीची कुठलीच कामे करणे अशक्य झाले असल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे.

हेही वाचा -उध्दव ठाकरेंच्या शपथविधीनंतर कराडमध्ये लाडू वाटप

ऑक्टोबरच्या शेवटी व नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस थंडीची चाहूल लागत असते. त्यामुळे कांदा (गरवा), गहू व हरभरा पिकास पोषक वातावरण असून त्याची लागण वा पेरणी केले जाते. मात्र, यावर्षी अजूनही म्हणावी अशी थंडी जाणवत नाही. त्यामुळे जी काही लागण व पेरणी झाली आहे त्या पिकांना पोषक वातावरण नाही. सध्या ज्वारी, गहू व हरभऱ्याची पेरणी सुरू आहे. तर, कांद्याची लागण वा बी टाकण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, वातावरणामुळे ज्वारीच्या क्षेत्रात घट होऊन कांदा, हरभरा व गहू यांच्या क्षेत्रात वाढ होणार आहे.

ज्यांनी कांदा लावला आहे, त्या कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यामुळे महागडी किटकनाशके व बुरशीनाशके फवारूनही करपा आटोक्यात आणण्यात यश येत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच जी काही पेरणी होणार आहे ती उशिरा झाल्यामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा -'महाविकासआघाडीच्या धर्तीवर कारखान्यांनीही किमान समान कार्यक्रम राबवावा'

ABOUT THE AUTHOR

...view details