सातारा -पावसाच्या आशेवर ज्वारी, गहू, हरभरा पिकांची पेरणी केलेली पिके काढण्यासाठी शेतकरी वर्गाने सुरुवात केली आहे. शेतकरी शेतीकामात मग्न झाला आहे. मात्र, पावसाचे प्रमाण कमी असल्याने उत्पन्नात निम्म्यापेक्षा जास्त घट झाली आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
रब्बी पिकाच्या काढणीला सुरुवात, अत्यल्प पावसामुळे उत्पन्नात घट - रब्बी पीक
यंदा जिल्ह्यात ५ ते ६ तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सगळीकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्वारी, हरभरा, गहू या पिकांना पुरेसे पाणी मिळाले नसल्याने पिकांचे उत्पादन कमी झाले आहे.
यंदा जिल्ह्यात ५ ते ६ तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सगळीकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्वारी, हरभरा, गहू या पिकांना पुरेसे पाणी मिळाले नसल्याने पिकांचे उत्पादन कमी झाले आहे, तर काही भागात पाण्यावर अवलंबून असलेली पिके पाण्याअभावी जळाले आहेत. थोड्याफार प्रमाणात पाणी मिळालेली पिके काढण्याची लगबग शेतकरी वर्गात दिसून येत आहे. कोरेगाव, फलटण, खटाव, माण या भागात चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच ज्वारीच्या कडब्याचा दर शेकडा ३ हजारांवर पोहोचला असून पशुधन जगवायचे कसे? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शासनाने लवकरात लवकर छावण्या चालू करण्याची मागणी शेतकरी करत आहे.