सातारा -जिल्ह्यात आलेली परंतु शासकीय यंत्रणेकडे नोंदणी न केलेली व्यक्ती आढळल्यास त्यावर गुन्हा नोंद करणार असल्याचा निर्वानीचा इशारा आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला. अशी व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास त्यालाही सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई-पुण्याहून येऊनही नोंदणी न करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार - जिल्हाधिकारी सिंह - satara corona patient
जिल्ह्यात आलेली परंतु शासकीय यंत्रणेकडे नोंदणी न केलेली व्यक्ती आढळल्यास त्यावर गुन्हा नोंद करणार असल्याचा निर्वानीचा इशारा आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला.
सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 4 रुग्ण हे मुंबईतून गावी आलेले सातारा जिल्हावासिय आहेत. सातारा जिल्ह्यात असे 1 लाख 40 हजार लोकांची आमच्याकडे नोंद आहे. परंतु, ही संख्या यापेक्षा जास्त असू शकते. या लोकांनी काळजी घेण्याची आणि हा साथरोग पसरू नये, म्हणून घराबाहेर न फिरण्याची गरज आहे. येथील भूमिपूत्र म्हणून त्यांची ही जबाबदारी आहे. मात्र, ही मंडळी ग्रामसमितीचे अथवा शासकीय यंत्रणेचे ऐकत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे साथरोग नियंत्रणासाठी अशा व्यक्तींविरुद्ध कडक पावले उचलण्यात येत असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.
पुण्या-मुंबईवरून आलेली आपल्या माहितीतील ताप, सर्दी, खोकला या लक्षणाची व्यक्ती आढळली. ज्याने ही माहिती शासकीय यंत्रणेकडून लपवली आहे. तर नागरिकांनी तत्काळ 1077 या टोलफ्री क्रमांकावर संबंधिताचे नाव, पत्ता आणि मोबाईल नंबरसह कळवावे. लाॅकडाऊन नंतर म्हणजे 23 मार्च नंतर बाहेरच्या शहरातून कोणी जवळची व्यक्ती आली असेल तर त्याचेही नाव टोल फ्री नंबरवर कळवावे. जेणेकरून संबंधितावर उपचार करण्यात येतील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.