महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शरीर संबंधांची मागणी करणा-यावर गुन्हा - satara crime news

वैभव अनंत गोळे याने महिलेचे अश्लील फोटो काढले. शारिरीक संबंध नाही ठेवले नाहीस तर ते व्हायरल करण्याची धमकी दिली. याचवेळी वैभव याने त्या महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. आणि तिला जातीवाचक शिवीगाळही केली. हा संपूर्ण घटनाक्रम २0१0 ते नोव्हेंबर २0२0 या दहा वर्षांच्या कालावधीत शाहूपुरीत घडला.

शरीर संबंधांची मागणी करणा-यावर गुन्हा
शरीर संबंधांची मागणी करणा-यावर गुन्हा

By

Published : Jun 17, 2021, 3:51 AM IST

सातारा- एका महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शरीर संबंधांची मागणी करणा-या एकावर गुन्हा दाखल झाला आहे. सदर व्यक्ती मोरावळे (ता. जावळी) येथील रहीवाशी आहे. विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ या प्रकरणी वैभव अनंत गोळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

१० वर्षे देत होता त्रास
वैभव अनंत गोळे हा गेली१० वर्षे पीडित महिलेला त्रास देत होता. पीडित महिला सध्या पुण्यात नोकरी करते. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, वैभव अनंत गोळे याने महिलेचे अश्लील फोटो काढले. शारिरीक संबंध नाही ठेवले नाहीस तर ते व्हायरल करण्याची धमकी दिली. याचवेळी वैभव याने त्या महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. आणि तिला जातीवाचक शिवीगाळही केली. हा संपूर्ण घटनाक्रम २0१0 ते नोव्हेंबर २0२0 या दहा वर्षांच्या कालावधीत शाहूपुरीत घडला. याप्रकरणी पीडित महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर वैभव अनंत गोळे याच्यावर गुन्हा दाखल झाला. अधिक तपास सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल करत आहेत.

हेही वाचा- आर्थिक राजधानीत अल्पवयीन मुलींवरील अत्याचार व हुंडाबळीच्या गुन्ह्यात वाढ

ABOUT THE AUTHOR

...view details