सातारा - संपूर्ण देशात लॉकडाऊन असतानाही लॉकडाऊनचे नियम डावलून महाबळेश्वरमध्ये उद्योगपती कपिल वाधवान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रवेश केला. या प्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी वाईच्या विभागीय अधिकारी संगीता चौगुले यांनी तक्रार दिली होती. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.
वाधवान प्रकरण : लॉकडाऊनचे नियम डावलणाऱ्यांवर गुन्हे दाखल; जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची माहिती - Sangeeta Chougule
राज्यात लॉकडाऊन असतानाही एका विशेष परवानगीने उद्योगपती कपिल वाधवान आणि त्यांचे कुटुंब महाबळेश्वरमध्ये दाखल झाले होते. याबद्दल आता वाधवान कुटुंबियांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![वाधवान प्रकरण : लॉकडाऊनचे नियम डावलणाऱ्यांवर गुन्हे दाखल; जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची माहिती Wadhwan case Satara Collector Shekhar Singh](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6740192-thumbnail-3x2-aa.jpg)
हेही वाचा...गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा;भाजप नेते आक्रमक
वाधवान कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कोरोनाची लागण झालेली नाही. मात्र, प्रक्रियेचा एक भाग म्हणून त्या सर्वांना पाचगणी येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्याुमळे पाचगणी, महाबळेश्वर येथील नागरिकांनी विनाकारण घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. तसेच वाधवान यांच्या प्रमाणेच इतर कोणतेही नागरिक जर सातारा जिल्ह्यात येत असेल, तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात येतील. अशी माहिती साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.