महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CM Eknath Shinde in satara : सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळी वाढीव सुविधा निर्माण करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश - मुख्यंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्हा दौऱ्यावर

सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी मोठ्या संख्येने ( tourist spots in Satara ) पर्यटक येथे येतात. यामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळी आणखीन चांगल्या वाढीव सुविधा निर्माण करण्याचे आदेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्ह्याच्या क वर्ग पर्यटन वाढीसाठी आराखडा तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली.

CM Eknath Shinde in satara
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

By

Published : Oct 31, 2022, 10:56 PM IST

सातारा - सातारा जिल्ह्यात पर्यटनासाठी मोठ्या संख्येने ( tourist spots in Satara ) पर्यटक येथे येतात. यामुळे सातारा जिल्ह्यातील पर्यटनस्थळी आणखीन चांगल्या वाढीव सुविधा निर्माण करण्याचे आदेश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्ह्याच्या क वर्ग पर्यटन वाढीसाठी आराखडा तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली.


मुख्यमंत्री सातारा जिल्हा दौऱ्यावर - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवसांच्या या खासगी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी दरे (ता. महाबळेश्वर) येथील निवासस्थानी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून विकासकामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी रुचेश जयंवशी यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकासकामांची माहिती दिली. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समिर शेख उपस्थित होते.



जिल्ह्यात पर्यटन विकासाला पुरेसा वाव - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाबळेश्वर, पाचगणी व्यतिरीक्त क वर्ग पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे क वर्ग पयर्टन स्थळांना चांगल्या सुविधा देण्यात येतील. जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे. त्यामुळे इतर ठिकाणीही पर्यटन वाढीसाठी प्रशासनाने आराखडा तयार करावा. जिल्ह्यात विविध यात्रा व उत्सव भव्य प्रमाणात साजरे होतात. यात्रा, उत्सवाला राज्यभरातून भाविक येत असतात. त्यांच्या सुविधांसाठीही निधी उपलब्ध करुन दिला जाईल.



हाऊस बोट सुविधा करण्याची सूचना - पर्यटन विकास आराखड्यात स्थानिकांना रोजगार व पर्यटकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. कोयना जलाशयाच्या ठिकाणी हाऊस बोट सारखी सुविधा निर्माण करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासना केली. कास परीसरात फुलांच्या हंगामा व्यतिरिक्त बारमाही पर्यटक येण्यासाठी सुविधा वाढविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचविलेल्या उपाययोजनांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली. अजिंक्यतारा आणि प्रतापगड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी वास्तुविशारद नेमण्यासही निधी दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details