सातारा - जिल्ह्यात कोरोना प्रसाराचा वेग मंदावला असून गेल्या 24 तासांत 881 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले. तर 28 बाधितांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठवले यांनी दिली.
वाढ खुंटली
काल आलेल्या बाधितांमध्ये सातारा तालुक्यात सर्वाधिक 178 रुग्ण आढळले. तर जावळीत 25, कराड 179, खंडाळा 108, खटाव 134, कोरेगाव 66, माण 43, महाबळेश्वर 2, पाटण 40, फलटण 62, वाई 35 व इतर 9 असे बाधीत तालुकानिहाय आढळून आले. आज अखेर एकूण 1 लाख 78 हजार 232 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. 7 हजार 500 नमुने घेण्यात आले. त्यापैकी 881 बाधित निघाले.
बाधितांचा दर 11.75 टक्के इतका आहे.