महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 7, 2020, 10:52 AM IST

ETV Bharat / state

कराडच्या कृष्णा, सह्याद्री रुग्णालयामधील 35 रुग्ण कोरोनामुक्त

कृष्णा रुग्णालयातून आतापर्यंत 144 आणि सह्याद्री रुग्णालयातून 49 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. हे रुग्ण कृष्णा आणि सह्याद्री रुग्णालयाच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते.

कराड
कराड

सातारा -कराड, पाटणसह सातारा जिल्ह्याच्या विविध भागातील एकूण 35 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्यावर कृष्णा आणि सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू होते. टाळ्यांच्या गजरात त्यांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.

आतापर्यंत कृष्णा रुग्णालयातून 144 आणि सह्याद्री रुग्णालयातून 49 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कराड तालुक्यातील म्हासोली येथील 6, पाटण तालुक्यातील 13, खटाव तालुक्यातील 2, सातारा तालुक्यातील 1, माण तालुक्यातील 2, वाई तालुक्यातील 3, खंडाळा तालुक्यातील 8, असे 35 रूग्ण कृष्णा आणि सह्याद्री रुग्णालयाच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते.

सर्व रुग्णांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. राहुल फासे यांच्या हस्ते कोरोनामुक्त रूग्णांचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details