सातारा -जिल्ह्यातील एकूण 131 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये जावळी तालुक्यातील पुनवडी येथील सर्वाधिक 31 जणांचा समावेश आहे. ताज्या माहितीनुसार जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा अडीच हजाराच्या घरात पोहचला असून 1 हजार 35 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. 1 हजार 304 रुग्ण बरे झाले आहेत. तर आत्तापर्यंत 81 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या अडीच हजारांच्या घरात - SATARA CORONA UPDATE
सातारा जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा अडीच हजाराच्या घरात पोहोचला असून 1 हजार 35 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत. 1 हजार 304 रुग्ण बरे झाले आहेत. तर आत्तापर्यंत 81 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
याशिवाय वाई तालुक्यातील 45, जावळी 37, सातारा 10, कराड 4, खंडाळा 13, कोरेगाव 2, पाटण 1, माण 3 व महाबळेश्वर तालुक्यातील 4 रुग्णांचा समावेश आहे. अँटिजन टेस्ट्सनुसार साताऱ्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय आणि रायगाव येथील कोविड केंद्रातील एकूण 10 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 19 नागरिकांना दहा दिवसांनंतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. गडीकर यांनी दिली.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत असलेल्या पुनवडी गावाला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भेट दिली आहे. त्यांनी प्रशासन आणि गावकऱ्यांना खबरदारीच्या सुचना केल्या. गावातील सर्व ग्रामस्थांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेतले आहेत. पुनवडी येथील परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.