कराड (सातारा) - कॉलेज संपल्यानंतर घरी जात असताना चुलत बहिणींच्या अॅक्टिवाला पुणे-बंगळुरू महामार्गावर कारने धडक दिली होती. अपघातात जखमी झाल्याने दोघींना कराडमधील कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना जखमीपैंकी एका बहिणीचा मृत्यू झाला. कल्याणी लोहार (रा. गोवारे, ता. कराड), असे तिचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी कार चालक रियाज बालेचाँद आत्तार (रा. लोणंद, ता. खंडाळा, जि. सातारा) याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
कॉलेजवरून घरी येताना सख्ख्या चुलत बहिणींच्या दुचाकीला कारची धडक, एकीचा मृत्यू - दोन बहिणींच्या गाडीला कारची धडक
कॉलेज संपल्यानंतर घरी जात असताना चुलत बहिणींच्या अॅक्टिवाला पुणे-बंगळुरू महामार्गावर कारने धडक दिली होती. अपघातात जखमी झाल्याने दोघींना कराडमधील कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना जखमीपैंकी एका बहिणीचा मृत्यू झाला. कल्याणी लोहार (रा. गोवारे, ता. कराड), असे तिचे नाव आहे.
चुलत बहिणी दुचाकीवरून गेल्या होत्या कॉलेजला -गोवारे (ता. कराड) येथील किशोरी लोहार आणि कल्याणी लोहार या सख्ख्या चुलत बहिणी मंगळवारी (दि. 24) अॅक्टिवा दुचाकीवरून (क्र. एम. एच. 09 बी. एन. 163) वाठार (ता. कराड) येथे कॉलेजला गेल्या होत्या. कॉलेज संपल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास त्या महामार्गावरून घरी निघाल्या होत्या. कल्याणी दुचाकी चालवत होती तर किशोरी पाठीमागे बसली होती. रस्ता क्रॉस करत असताना क्रेटा कारने (क्र. एम. एच. 12 पी. एन. 1668) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत कल्याणी क्रेटा कारसोबत फरफटत गेली, तर किशोरी ही गाडीवरून पडल्याने तिलाही दुखापत झाली. कल्याणीच्या डोक्याला जबर मार लागल्याने ती कोमात गेली होती. अपघातस्थळी जमलेल्या लोकांनी दोघींनाही उपचारासाठी कृष्णा रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना बुधवारी (दि. 25) रात्री दहाच्या सुमारास कल्याणीचा मृत्यू झाला.
दोघी होत्या एमबीएच्या विद्यार्थिनी -कल्याणी आणि किशोरी या दोघी चुलत बहिणी वाठार (ता. कराड) येथील कृष्णा फाऊंडेशनच्या एमबीए कॉलेजमध्ये शिकत होत्या. अपघातात कल्याणीचा मृत्यू झाल्याने कृष्णा फाऊंडेशनसह गोवारे गावावर शोककळा पसरली.