महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Satara Crime : साताऱ्यातील वाघोली गावात जावयाकडून चुलत सासऱ्याची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या - चुलत सासऱ्याची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या

जमिनीच्या वादातून जावयाने चुलत सासऱ्याची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या केली आहे. या घटनेत सुनील शंकर भोईटे (वय ४८) यांचा जागीच मृत्यु झाला आहे. रवी यादव, असे संशयितांचे नावे असून संशयिताचा भाऊ सुनील यादव हा देखील घटनास्थळी उपस्थित होता. दोघेही स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Apr 17, 2023, 10:27 PM IST

सातारा - साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. सासुरवाडीतील जमिनीच्या वादातून जावयाने चुलत सासऱ्याची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या केली आहे. या घटनेत सुनील शंकर भोईटे (वय ४८) यांचा जागीच मृत्यु झाला आहे. रवी यादव, असे संशयिताचे नाव असून संशयिताचा भाऊ सुनील यादव हा देखील घटनास्थळी उपस्थित होता. दोघेही स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले.

चुलत सासरा-जावयात जमिनीचा वाद - घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मयत सुनील भोईटे यांचे बंधू नामदेव भोईटे यांना दोन विवाहित मुलीच आहेत. नामदेव यांचा जावई रवी यादव याने सख्ख्या सासऱ्याच्या हिश्याची जमीन विकली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या जमिनीसंदर्भात संशयिताचा चुलत सासरा सुनील भोईटे यांनी न्यायालयात दावा दाखल केलेला होता. यावरूनच जावई रवी यादव आणि चुलत सासरा सुनील भोईटे यांच्यात वाद झाला होता.

भर रस्त्यात गोळ्या घातल्या -सोमवारी सायंकाळी नामदेव याचे जावई रवी यादव व सुनिल यादव या दोघांनी वाघोली येथे सुनील भोईटे व त्यांचा मुलगा दुचाकीवरून घराकडे निघाले असताना त्यांना वाटेत अडवून भोईटे यांच्यावर पिस्तूल रोखले. भोईटे यांचा मुलगा वडिलांना मारू नका म्हणून हात जोडून विनवण्या करीत होता. मात्र, संशयिताला पाझर फुटला नाही. संशयित रवी यादव याने भोईटे यांच्या पोटात व छातीत तीन गोळ्या घातल्या.

रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू -गोळ्या वर्मी लागल्याने सुनील भोईटे जागीच कोसळले. त्यांना तातडीने पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. संशयित रवी यादव आणि त्याचा भाऊ सुनिल यादव हे सोळशी (ता. कोरेगाव) गावचे असून ते सध्या पुण्यात वास्तव्यास असतात. चुलत सासऱ्याच्या हत्येनंतर दोघेही स्वतःहून वाठार पोलीस ठाण्यात हजर झाले.

हेही वाचा -Cloth Theft Incident Mumbai: उच्चभ्रू ग्राहक बनून आल्या अन् 7.5 लाखांचे कपडे चोरून झाल्या फुर्रर्र..; महिला चोरांचा प्रताप

ABOUT THE AUTHOR

...view details