महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्याच्या सैनिक स्कूलमध्ये कोरोनाचा शिरकाव; तीन विद्यार्थ्यांना बाधा - सातारा सैनिक स्कूलमधील तिघांना कोरोना

साताऱ्याच्या सैनिक स्कूल मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे; येथील तीन विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर इतर विद्यार्थ्यांची चाचणी केली जाणार आहे.

SATARA
सैनिक स्कूलमध्ये कोरोनाचा शिरकाव

By

Published : Mar 19, 2021, 7:04 AM IST

Updated : Mar 19, 2021, 8:29 AM IST


सातारा - जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत चालला असून बुधवारी जिल्ह्यात 303 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. या पाठोपाठ विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देणाऱ्या सातारा सैनिक स्कूल मध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याचे समोर आले आहे. येथील तीन विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचा धक्कादायक अहवाल आला आहे. याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ डी.जी. पवार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठले यांनीही सैनिक स्कूलमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव झाल्याच्या या वृत्ताला दुजोरा दिला.

सैनिक स्कूलमध्ये कोरोनाचा शिरकाव

गावाहून कोरोना घेऊन आले -

डॉ. पवार यांनी सांगितले की, काही विद्यार्थी सुट्टीवर आपल्या गावी गेले होते. तेथून परत आल्यानंतर पाच विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. फलटण, उंब्रज, बारामती, खटाव या भागातून हे विद्यार्थी आले आहेत. या तीनही विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना सैनिक स्कूल मध्येच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

स्कूलमध्ये कोरोनाचा शिरकाव

संपर्कातील विद्यार्थ्यांचीही तपासणी-

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या विद्यार्थ्याच्या संपर्कात इतर विद्यार्थी आले होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 35 विद्यार्थी व दोन शिक्षकांची आज वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ. पवार यांनी स्पष्ट केलं.

पालकमंत्र्यांची भेट -

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी गुरुवारी सैनिक स्कूलला भेट देऊन याठिकाणी करण्यात येणाऱ्या विकासकामांच्या अनुषंगाने पाहणी केली. या पाहणी दरम्यान सैनिक स्कूलचे प्राचार्य उज्वल घोरमाडे यांनी तीन विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आल्याची कल्पना पालकमंत्र्यांना दिली. जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा वेग वाढत असून काल (बुधवारी) 303 कोरोना बाधित आढळून आले आहेत. वाढत्या संसर्गावर मात करण्यासाठी व्यापारी, किराणा दुकानदार, भाजीविक्रेते यांनी टेस्ट करून घेऊनच दुकानात बसावे. अशा टेस्ट करण्यासाठी प्रशासनाकडून मिशन मोडवर काम केले जावे तसेच लस देण्याचा वेग वाढवावा, अशा सूचना आज या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनाला केल्या.



Last Updated : Mar 19, 2021, 8:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details