महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता साताऱ्यात होणार कोरोना चाचणी, पालकमंत्र्यांची माहिती - satara corona news

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा (आरटी पीसीआर लॅब) उभारण्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील
पालकमंत्री बाळासाहेब पाटील

By

Published : Jul 7, 2020, 3:33 AM IST

Updated : Jul 7, 2020, 8:47 AM IST

सातारा - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा (आरटी पीसीआर लॅब) उभारण्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

राज्य शासनाकडून तातडीची बाब म्हणून साताऱ्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्यास मंजूरी दिली आहे. यासाठी आवश्यक असलेल्या 75 लाख 46 हजार इतका निधी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, जिल्हा नियोजन समितीमधून खर्च करण्यास मंजूरी दिली आहे. या प्रयोगशाळेसाठी लागणारी यंत्रसामुग्री ई-टेंडरऐवजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, कोल्हापूर यांच्याकडील 18 एप्रिलच्या पुरवठा आदेशानुसार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच लागणारे आवश्यक ते तांत्रिक मनुष्यबळ व त्यावरील खर्च राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गंत उपलब्ध निधीतून करण्यासही मान्यता मिळाली आहे.

सातारा जिल्ह्यात आरटी पीसीआर लॅब नसल्याने कोरोनाच्या चाचणीसाठी रुग्णांचे स्वॅब (घशातील स्त्राव) नमुने पुणे येथे पाठवावे लागत आहेत. आता कोरोना चाचणी प्रयोगशाळेस मान्यता मिळाल्याने वेळ वाचणार आहे.

जिल्ह्यात येणारी बहुतांश कुटुंबे ही कंटेनमेंट, हॉटस्पॉट व रेड झोनमधील असल्याने या सर्व नागरिकांचे लक्षणे दिसत असल्यास कोरोना तपासणी करणे अनिवार्य ठरत आहे. तपासणीसाठी व अहवाल प्राप्तीसाठी लागणारा कालावधी पाघता प्रशासकीय यंत्रणेवर ताण येत आहे. तसेच यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्चही होत आहे. ही परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हा रुग्णालयात आरटीपीसीआर लॅबसाठी प्रस्ताव पाठवला होता.

हेही वाचा -कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर मंदावला, पाण्याची आवक वाढली

Last Updated : Jul 7, 2020, 8:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details