कराड (सातारा)- मुंबईवरुन आल्यानंतर विलगीकरण कक्षात उपचार सुरू असताना पाटण तालुक्यातील 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्या महिलेचा स्वॅब तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी तिचा मृत्यू झाला होता.
पाटण तालुक्यातील 'त्या' मृत महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
कोरोना तपासणी अहवाल येण्यापूर्वीच मुंबईवरुन आलेल्या 43 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. कोरोना संशयित समजून प्रशासनाने कराडमध्ये तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
पाटण तालुक्यातील मृत महिला कोरोना पॉझिटिव्ह
कोरोना संशयित महिलेच्या घशातील स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. महिलेवलर विलगीकरण कक्षात उपचार सुरू होते. मृत्यूनंतर कोरोना संशयित समजून तिच्यावर कराडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
कोरोना संशयित महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सातारा जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या तीन झाली आहे.