कराड (सातारा)- मुंबईवरुन आल्यानंतर विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेल्या बनपुरी (ता. पाटण) येथील 43 वर्षीय महिलेचा सोमवारी मृत्यू झाला. तिच्या घशातील स्वॅब तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तसेच कोरोना संशयित समजून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विलगीकरणातील पाटणच्या महिलेचा मृत्यू; कोरोना संशयित समजून अंत्यसंस्कार - कराड कोरोना
सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी विलगीकरणात असलेल्या 232 जणांच्या घशातील स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
corona
सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी विलगीकरणात असलेल्या 232 जणांच्या घशातील स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 20, कृष्णा हॉस्पिटल, कराड येथील 105, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 67, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 11, ग्रामीण रुणालय, कोरेगाव येथील 17 आणि ग्रामीण रुणालय, वाई येथील 12 रूग्णांचा समावेश आहे.